“सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल”, असुरवन दिग्दर्शक सचिन आंबात सचिन चांदवडेच्या आठवणीत भावूक

*“सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल”, असुरवन दिग्दर्शक सचिन आंबात सचिन चांदवडेच्या आठवणीत भावूक*
स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु ४ दिवसातच मनाला चटका देणारी बातमी समजली. असुरवन चित्रपटातील कलाकार सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. इतक टोकाच पाऊल त्याने का उचललं हे अजून ही कळलेलं नाही. असुरवन चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन आंबात यांच्याशी सचिन चांदवडे विषयी विचारण्यात आलं.
तेव्हा ते म्हणाले, “मी एक दिवसापूर्वीच त्याला शेवटचा कॉल केला होता. सिनेमाच्या प्रमोशनच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे टीम मेंबर्स, कलाकार भेटणार होतो. त्यासाठी मी त्याला कॉल करून ठाण्याला बोलवलं होत. त्याने ही मी जळगाववरून नक्की येतो अस मला सांगितलं होत. तो खुप उत्साहित होता फिल्मच्या प्रदर्शनासाठी. त्याच्या फिल्म कॅरॅक्टर पोस्टरला मिळणारा प्रतिसाद बघून तो खुश होता, त्या बद्दल तो माझ्याशी उत्साहाने बोलत होता, लाखो व्यूज त्याच्या पोस्टरवर आले होते.
पुढे ते सांगतात, “ठाण्याला भेटून आम्ही सेलिब्रेट करणार होतो. पण ते शक्य झाले नाही. आम्ही भेटण्या आधीच त्याने हे टोकचं पाऊल हुचलल. ही बातमी ऐकून आम्ही सगळेच शॉक मध्ये आहोत. हे अस का केल त्याने , ह्या बद्दल काहीच कळत नाहीये.. मी तर , सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल. असुरवन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आम्हाला एकत्र चित्रपट पाहायचा होता. हे स्वप्न आमचं सत्यात उतरणारं होत. आता हे स्वप्न स्वप्नचं राहील. पण तो कायम माझ्या आठवणीत राहील.”



