Entertainment

*महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, ५ डिसेंबर पासून चित्रपटगृहात*

*महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, ५ डिसेंबर पासून चित्रपटगृहात*

*खबर कलली का!! ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा*

स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर नुकताच या चित्रपटाचा चित्तथरारक टीजर प्रदर्शित झाला आहे. ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘असुरवन’ हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कमी कालावधीतच ‘असुरवन’ चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सचिन आंबात लिखित व दिग्दर्शित ‘असुरवन’ हा चित्रपट आदिवासी प्राचीन वारली परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. जसा पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, तसंच टीजर मधील खबर कलली का ? हा डायलॉग मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सचिन आंबात आहेत. तसेच या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे, मनोज कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सचिन आंबात चित्रपटाच्या टीजरविषयी म्हणतात, “‘असुरवन’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीतील परंपरेचे आणि श्रद्धेचे दर्शन आहे. “असुरवन” महाराष्ट्रातील श्रद्धा, जंगल, डोंगर, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हे जंगल, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची. मराठी चित्रपटात असा प्रयत्न कदाचित पहिल्यांदाच झाला असावा. त्यामुळे माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट ५ डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा.”

Link – https://youtu.be/V805jfzdMLM

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button