General
*निवारा*
*निवारा*
विजेच्या खांबावर,
पिल्लांनी शोधला आधार!
चिंब भिजलेल्या अंगाने,
परीक्षा घेतली पावसाने!!
थंडीने अंग शहारले,
पाहणारेही घाबरले!
आई शोधतेय निवारा,
मुलांसाठी हवा गारवा!!
मेघराजा सतत बरसत,
मातेची तारेवर कसरत!
घास भरवण्या लेकरांना,
जमवत होती एकेक दाणा!!
शमली तेव्हा पोटाची भ्रांत,
मेघराजाही झाला शांत!
पुन्हा उडाली माय आकाशी,
जीव ठेवून पिल्लांपाशी !!
तारेवरची कसरत सारी,
जगण्याची रीतच न्यारी!
पक्ष्यांचं जगणे शिकवते
संघर्षातच गंमत भारी!!
*- जयवंत कोंडीबा बामणे,*
कवी, ज्येष्ठ पत्रकार
दैनिक पुण्यनगरी,
मुंबई.