Marathi

गौतमीचं ठसकेबाज नृत्य आणि निकची खतरनाक हुकस्टेप साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचा टीझर तुमच्या भेटीला

गौतमीचं ठसकेबाज नृत्य आणि निकची खतरनाक हुकस्टेप साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचा टीझर तुमच्या भेटीला
 
गौतमी पाटील आणि निक शिंदे साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्यात पहिल्यांदाच दिसणार एकत्र, टीझर प्रदर्शित

गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे कॅप्शन देत त्याने २ दिवसापूर्वी पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर या गाण्यात निकसोबत गौतमी असणार आहे. हे स्वतः गौतमीने सोशल मीडियावर सांगितले होते. टीझर पाहता गाण जबराट असणार आहे यात काही शंका नाही.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे यांची फ्रेश जोडी या गाण्यात झळकणार आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे.  हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button