Entertainment

मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा Ghibli स्टाईल फोटो व्हायरल
आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. नुकतंच तिने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरमध्ये ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचसोबत नव्या ट्रेंडमधील (Ghibli) स्टाईल पोस्टरं तिच्या चाहत्यांनी बनवले आहे.
“कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे. सूत्रांच्या मते, हे गाणं ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर नुकताच शेअर केला आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच मी शेअर केलेल्या “कृष्ण मुरारी” या गाण्याच्या पोस्टरचा (Ghibli) स्टाईल फोटोसुद्धा फारच आकर्षक आहे. तर हे गाणं ५ एप्रिलला प्रदर्शित होईल. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हे गाण नक्की बघा आणि या गाण्याला खूप प्रेम द्या.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button